महसूल विभागात डिजिटल क्रांती
डिजिटल ७/१२, ८-अ व फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध
महसूल विभागात ऐतिहासिक डिजिटल परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्यात आले आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे.
हे पण वाचा तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू
या निर्णयामुळे आता डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता मिळणार असून, फक्त ₹१५ मध्ये अधिकृत उतारा उपलब्ध होणार आहे. यामुळे तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज पूर्णतः संपुष्टात येणार आहे. नवीन डिजिटल उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असणार असून, हे उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग तसेच न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असतील.
या निर्णयामुळे शेतकरी, जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सेवा अधिक पारदर्शक, जलद व सुरक्षित होणार आहेत. महसूल प्रशासनातील ही डिजिटल सुधारणा ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


