तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू

0
129
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू

तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू

 ५ डिसेंबर २०२५ पासून नवे नियम

मुंबई | प्रतिनिधी

रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. मडगाव जंक्शन – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22413, कोकण रेल्वे) साठी ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) आधारित तत्काळ बुकिंग प्रणाली ५ डिसेंबर २०२५ पासून लागू होत आहे.

हे पण वाचा उरण मार्गावर तारघर-गव्हाणला नवी स्थानके मंजूर 

भारतीय रेल्वेने हा निर्णय राजधानी, दुरांतो, वंदे भारत एक्सप्रेस सह निवडक प्रीमियम गाड्यांसाठी घेतला असून, यामुळे तात्काळ तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.

या नव्या योजनेनुसार, ओटीपी प्रमाणीकरण झाल्यानंतरच तात्काळ तिकीट बुकिंग करता येणार आहे. बुकिंग दरम्यान सिस्टम द्वारे एक अद्वितीय ओटीपी जनरेट करून प्रवाशाने दिलेल्या मोबाइल नंबरवर पाठवण्यात येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईल.

तसेच पीआरएस काउंटर आणि अधिकृत एजंटद्वारे तिकीट बुकिंग करतानाही ओटीपी पडताळणी बंधनकारक असणार आहे. त्यामुळे बनावट बुकिंग, दलालांचा गैरवापर आणि तांत्रिक फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

रेल्वेकडून प्रवाशांना बुकिंगच्या वेळी स्वतःचा मोबाइल नंबर अद्ययावत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून ओटीपी मिळण्यात कोणताही विलंब होणार नाही.

तात्काळ बुकिंग प्रक्रिया अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि खऱ्या प्रवाशांसाठी सुलभ व्हावी, या उद्देशाने ओटीपी आधारित प्रणाली लागू करण्यात येत आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

———————————————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here