महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा; ₹१२.३५ प्रति किलो दराने कांदा खरेदीचा निर्णय
News :
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi0 यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी (Shivraj Singh Chouhan) यांनी आजपासून महाराष्ट्रात ₹१२.३५ प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सातारा येथे आयोजित पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिली.
कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शासनाच्या या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार मिळून आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील कांदा उत्पादक भागांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

