‘महाराजस्व समाधान शिबीर’ वर्षभर प्रभावीपणे राबवा; महसूल विभागाने नागरिकसेवेसाठी कटिबद्ध राहावे – पालकमंत्री नितेश राणे

0
12
‘महाराजस्व समाधान शिबीर’ वर्षभर प्रभावीपणे राबवा; महसूल विभागाने नागरिकसेवेसाठी कटिबद्ध राहावे – पालकमंत्री नितेश राणे
‘महाराजस्व समाधान शिबीर’ वर्षभर प्रभावीपणे राबवा; महसूल विभागाने नागरिकसेवेसाठी कटिबद्ध राहावे – पालकमंत्री नितेश राणे

‘महाराजस्व समाधान शिबीर’ वर्षभर प्रभावीपणे राबवा; महसूल विभागाने नागरिकसेवेसाठी कटिबद्ध राहावे – पालकमंत्री नितेश राणे

News :
नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाने केवळ अभियानापुरते मर्यादित न राहता वर्षभर नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane )यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय (Sindhudurg Collector Office) येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Tripti Dhommise ), मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर (Ravindra Khebudkar), जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी (Manish Dalvi),  जिल्हा बँक अध्यक्ष , निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सिंधुदुर्गनगरीचा ‘आकार बंद’ जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला.

पालकमंत्री राणे म्हणाले की, शासनाच्या सेवा वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या अभियानामुळे नागरिकांना फेरफार दाखले, वारस नोंद, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका तसेच विविध महसूल विषयक अर्जांचे निपटारे एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत. प्रशासन पारदर्शक असावे, नागरिकांना कमी वेळेत सेवा मिळावी आणि ते समाधानी होऊन घरी परतावेत हा या शिबिरामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, ७ मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ मंडळांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून ११ महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या तब्बल २०,२०१ दाखल्यांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी अभियानाची पार्श्वभूमी स्पष्ट करत नागरिकांनी या शिबिरांचा सक्रियपणे लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here