महाराष्ट्रातील फार्मासिस्ट्ससाठी महत्त्वाची सूचना; PCI आणि NHA-HPR एकत्रीकरणाची अंतिम मुदत २८ ऑगस्ट

0
7

मुंबई :
महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत फार्मासिस्ट्ससाठी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडून (MSPC) महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) यांच्या राष्ट्रीय निर्देशानुसार महाराष्ट्रातील नोंदणीकृत फार्मासिस्ट्सना आपली प्रोफाईल हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री (NHA-HPR) शी एकत्रित (Integration) करणे अनिवार्य असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
ही सूचना १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली असून, त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. PCI आणि NHA-HPR एकत्रीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२६ आहे.
सर्व नोंदणीकृत फार्मासिस्ट्सनी आपली व्यावसायिक माहिती अद्ययावत करून ती सत्यापित करावी, PCI आणि NHA-HPR एकत्रीकरणाची अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करावी तसेच आपल्या नोंदणीतील सर्व तपशील अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता दिलेल्या कालावधीतच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन MSPC कडून करण्यात आले आहे. २८ ऑगस्ट २०२६ पूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत फार्मासिस्ट्सनी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here