मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आरोग्य व शिक्षण विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा

0
6
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आरोग्य व शिक्षण विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आरोग्य व शिक्षण विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आरोग्य व शिक्षण विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा

मीरा-भाईंदर :
मीरा-भाईंदर महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक २१ ऑगस्ट २०२६ रोजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर डिंपल विनोद मेहता तसेच महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात PET Scan तपासणी केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच PPP तत्त्वावर सुरू असलेल्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल संदर्भात प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
यासोबतच महानगरपालिका शाळा खासगी शाळा अथवा संस्थांमार्फत दत्तक देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने संबंधित विषयांवर प्रशासनाने सकारात्मक, ठोस आणि नियोजनबद्ध कार्यवाही करावी, तसेच आवश्यक उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
आरोग्यसेवांमध्ये आधुनिक निदान सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच महानगरपालिका शाळांमध्ये आवश्यक सुविधा आणि प्रभावी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन, संबंधित संस्था आणि शाळा व्यवस्थापन यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
बैठकीस उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, आरोग्य व वैद्यकीय आरोग्य समिती सभापती मधुसुदन पुरोहित, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त (मुख्यालय) डॉ. सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी, डायग्नोस्टिक अधिकारी, डॉक्टर तसेच विविध शाळांचे ट्रस्टी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here