महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा ४ जुलै रोजी

0
21

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) च्या नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाचा २०२६–२०२८ कार्यकाळासाठी पदग्रहण समारंभ शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Y. B. Chavan Centre), नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात MACCIAचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे आणि नव्या कार्यकारिणी मंडळाचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. उद्योग, व्यापार, कृषी, सहकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून राज्यातील उद्योग-व्यापार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
समारंभाची सुरुवात दुपारी ३.०० वाजता होणार असून, उपस्थित मान्यवरांसाठी दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमानंतर चहापानाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या पदग्रहण समारंभासाठी उद्योग, व्यापार, कृषी, उद्योजक, विविध व्यावसायिक संस्था तसेच चेंबरचे सदस्य आणि मान्यवरांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here