महाराष्ट्र ज्युनिअर ॲथलेटिक्समध्ये जयनी पाटीलची सुवर्णभरारी; १६ वर्षांखालील गोळाफेकमध्ये पटकावले सुवर्णपदक

0
34
राष्ट्रीय स्पर्धेतही जयनीने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी यावेळी तिला विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी चेन्नईला निवड; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते साखर संकुलात सत्कार

पुणे :
चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या ४०व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कु. जयनी गौरी विठ्ठल पाटील हिने १६ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
कमी वयात मिळवलेले हे यश जयनीची मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित असल्याचे कौतुक करण्यात आले. तिच्या या दमदार कामगिरीबद्दल पुण्यातील साखर संकुल येथे तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जयनी पाटीलचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत जयनीने आपल्या क्रीडा कौशल्याची चमक दाखवली असून, तिच्या या कामगिरीमुळे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जयनी पाटीलची निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतही जयनीने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी यावेळी तिला विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here