महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण

0
16
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण

मुंबई –
चर्नीरोड, मुंबई परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जवाहर बाल भवन च्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी बालभवन च्या नूतन वास्तूची पाहणी केली.
महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल, असे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे.
नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here