एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारीपदी आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती

0
32

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदावर उप-महानिरीक्षक (DIG) दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदावर सक्षम पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रियंका नारनवरे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी असून पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्था, दक्षता यंत्रणा तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीमुळे एसटी महामंडळातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार असून, विविध स्तरांवरील दक्षता आणि देखरेख यंत्रणा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here