‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट – २०४७’ अंतर्गत महत्वाकांक्षी निर्णय!

0
96
‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट - २०४७’ अंतर्गत महत्वाकांक्षी निर्णय!
‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट - २०४७’ अंतर्गत महत्वाकांक्षी निर्णय!

‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट – २०४७’ अंतर्गत महत्वाकांक्षी निर्णय!

— विश्वनाथ पंडित, ठाणे

‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट - २०४७’ अंतर्गत महत्वाकांक्षी निर्णय!

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट – २०४७’ अंतर्गत मराठी भाषेच्या यजागतिक प्रसारासाठी घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. मराठीतील पाचशे निवडक पुस्तकांचे जगातील पन्नास भाषांमध्ये भाषांतर करण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरेल. संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत अनेक लेखकांनी सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडवीत मराठी साहित्य अत्यंत समृद्ध केलेले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठी साहित्याची ओळख विविध देशांतील वाचकप्रिय नागरिकांना त्यांच्या मातृभाषेतून होणार आहे. त्यामुळे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती अभ्यास, संशोधन आणि जागतिक पातळीवरील स्वीकार वाढण्यास मोठी मदत होईल सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठीतील कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे, सामाजिक विचार आणि लोकसंस्कृती जगासमोर मांडण्याची ही सुवर्णसंधी म्हणावी लागेल.
मात्र भाषांतर करताना मूळ साहित्याचा आत्मा जपणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तकाचे मूळ नाव, लेखकाचे विचार, आशय, कथानकाची मांडणी आणि साहित्यिक संवेदना यांना कोणत्याही प्रकारे धक्का लागता कामा नये. कारण भाषांतर ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसून ती संस्कृती, भावना आणि विचारांचे रूपांतर असते. चुकीच्या किंवा अपूर्ण भाषांतरामुळे मूळ साहित्याचा अर्थ बदलण्याची शक्यता असते आणि भविष्यात ते वादाचे कारणही ठरू शकते म्हणून भाषांतर प्रक्रियेत अचूकतेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. मराठी भाषेचा जागतिक प्रवास अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. मराठी साहित्य जागतिक वाचकांपर्यंत पोहोचल्यास मराठी भाषेचा अभिमान अधिक उंचावेल आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here