महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट

0
10

मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदान (MMRDA Grounds) येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शन (Mahalaxmi Saras Exhibition) 2026 ला रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (Neha Bhosale) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे (Priyadarshini More) यांनी भेट देऊन महिला बचतगटांना प्रोत्साहन दिले.

२ ते १७ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील तब्बल २८ महिला बचतगट सहभागी झाले आहेत. विविध घरगुती, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि ग्रामीण उत्पादनांचे स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी मंगळवारी प्रदर्शनाला भेट देत महिला बचतगटांच्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here