चिपळूण रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरी करणारा आरपीएफच्या ताब्यात
चिपळूण रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरी करणारा आरपीएफच्या ताब्यात
रत्नागिरी :चिपळूण रेल्वे स्थानक (Chiplun Railway Station) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला आरपीएफ (Railway Protection Force) ने अटक केली आहे.
१२ मे २०२६ रोजी चिपळूण रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरपीएफने तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चार्जिंगसाठी ठेवलेला मोबाईल चोरणाऱ्या संशयिताची ओळख पटविण्यात आली.
या कारवाईत एएसआय दिगंबर सिंग आणि हवालदार सचिन गवाडे यांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून सिम कार्डसह सुमारे ₹१४,००० किमतीचा चोरीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास आरपीएफकडून सुरू असून, प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.