महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात 3 लाख 21 हजार स्मार्ट टीओडी मीटर

0
12
हावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात 3 लाख 21 हजार स्मार्ट टीओडी मीटर
हावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात 3 लाख 21 हजार स्मार्ट टीओडी मीटर

महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात 3 लाख 21 हजार स्मार्ट टीओडी मीटर

 स्मार्ट मीटर बसवलेल्या उपविभागांत बिलिंग तक्रारी नगन्य

 स्मार्ट मीटरमुळे नऊ महिन्यात 1 कोटी 70 लाखांची सवलत

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : राज्यातील वीज ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 23 हजार 247 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 98 हजार 330 असे एकूण 3 लाख 21 हजार 577 स्मार्ट टीओडी मीटर रत्नागिरी परिमंडलामध्ये बसविण्यात आले आहेत. उर्वरित वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मीटर बसवून घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 89 हजार 410 लघुदाब ग्राहक, 239 उच्चदाब ग्राहक, 23 हजार 35 लघुदाब नवीन विद्युत जोडणी, 14 उच्चदाब नवीन जोडणी, 373 वीज वाहिनी, 8 हजार 664 वितरण रोहित्र, 1 हजार 311 पुनर्जोडणी, तर 201 वीज निर्मिती प्रकल्प/ केंद्र यांना स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 79 हजार 887 लघुदाब ग्राहक, 74 उच्चदाब ग्राहक, 12 हजार 971 लघुदाब नवीन विद्युत जोडणी, 6 उच्चदाब नवीन जोडणी, 207 वीज वाहिनी, 4 हजार 708 वितरण रोहित्र, 436 पुनर्जोडणी, तर 41 वीज निर्मिती प्रकल्प/ केंद्र यांना स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
वीज बिल तक्रारी नगन्य; टीओडीचा लाभ एक कोटी
स्मार्ट टीओडी मीटरमुळे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना चालू आर्थिक वर्षात 85 पैसे इतकी सवलत मिळत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्मार्ट टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मासिक बिलातून ऑगस्ट 2025 ते एप्रिल 2026 या नऊ महिन्यात 1 कोटी 70 लाखांची टीओडी सवलत दिली आहे. तसेच स्मार्ट मीटर बसलेल्या ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारी नगन्य झाल्या आहेत.
स्मार्ट मीटर मुळे शंभर टक्के अचूक देयके मिळतात तसेच ग्राहकांना त्यांचा दर तासानुसार होणारा विजेचा वापर महावितरणच्या मोबाईल ॲपवर समजतो, यामुळे अधिक पारदर्शकता निर्माण होत आहे. तसेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 या सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. तरी सर्व वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करावे असे आवाहन महावितरण करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here