महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा ‘हिरकणी महोत्सव’, मंत्री गणेश नाईक यांची भेट

0
11

नवी मुंबईतील करावे गाव येथे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन; महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन

नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने करावे गाव येथील तांडेल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘हिरकणी महोत्सवा’ला वनमंत्री गणेश नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन महिला बचत गट आणि संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनांची पाहणी केली.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शन व विक्री महोत्सवात महिला बचत गट आणि विविध संस्थांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू, सजावटीचे साहित्य तसेच विविध प्रकारच्या उत्पादनांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची आणि त्यातून उत्पन्न मिळविण्याची संधी या महोत्सवामुळे निर्माण झाली आहे.
महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळण्यास मदत होत आहे.
यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते सागर नाईक, महापौर सुजाता पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार, उपसभापती रूपाली भगत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here