महिला सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ सेवेचा राज्यभर शुभारंभ

0
57
महिला सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ सेवेचा राज्यभर शुभारंभ
महिला सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ सेवेचा राज्यभर शुभारंभ

महिला सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ सेवेचा राज्यभर शुभारंभ

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या संयुक्त सहकार्याने काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांसाठी ‘बीग्सी’ (BYGSY) या अभिनव सेवेचा शुभारंभ करण्यात आला. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते या सेवेचा औपचारिक प्रारंभ झाला.

या वेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, वाहतूक विभागाचे उपआयुक्त अजित बोगार्डे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रा. निरंजन भट यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘बीग्सी’ ही सेवा महिला प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि खर्चमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आली असून, गृह विभाग व परिवहन विभागाच्या सहकार्याने ती राज्यभर राबविण्यात येणार आहे. ही सेवा सामाजिक जाणिवेतून सुरू करण्यात आली असून, भविष्यात महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, टॅक्सी व रिक्षा प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here