माजी विद्यार्थी सहदेव लोके यांची दीड लाखांची देणगी

0
46
माजी विद्यार्थी सहदेव लोके यांची दीड लाखांची देणगी
माजी विद्यार्थी सहदेव लोके यांची दीड लाखांची देणगी

माजी विद्यार्थी सहदेव लोके यांची दीड लाखांची देणगी

शिरगाव हायस्कूलच्या वर्गखोल्यांना नवे रूप

प्रतिनिधी l पांडुशेठ साठम

आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. सहदेव गणपत लोके यांनी एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. आपल्या पत्नी कै. सौ. सुगंधा सहदेव लोके यांच्या स्मरणार्थ त्यांनी शिरगाव हायस्कूलच्या वर्ग खोली नूतनीकरणासाठी १,५०,०००/- रुपयांचा निधी शाळेला सुपूर्द केला.

शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात धनादेश शिरगाव पंचक्रोशी ( ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई

संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुणभाई कार्ले यांच्याकडे सोपवण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संभाजी साटम, उपाध्यक्ष श्री. गणपत तावडे आणि श्री. प्रकाश गोठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो, असे मत व्यक्त करत

संस्था अध्यक्ष अरुणभाई कार्ले यांनी श्री. लोके यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. “माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची नाळ जोडून ठेवल्यास ग्रामीण भागातील शिक्षण अधिक दर्जेदार होण्यास मदत होते,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. श्री. सहदेव लोके यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here