माजी सैनिकांच्या कौटुंबिक तक्रारींसाठी २८ ऑक्टोबरला रत्नागिरीत बैठक
माजी सैनिकांच्या कौटुंबिक तक्रारींसाठी २८ ऑक्टोबरला रत्नागिरीत बैठक
रत्नागिरी :
देशसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसह कौटुंबिक तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक होणार आहे.
माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कौटुंबिक संरक्षण, सुरक्षितता अथवा अन्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असल्यास त्यांनी या बैठकीत उपस्थित राहून आपली तक्रार मांडावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
बैठकीला उपस्थित राहणाऱ्या तक्रारदारांनी आपला लेखी तक्रार अर्ज आणि त्यासंबंधित आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. तसेच निर्धारित वेळेत उपस्थित राहून तक्रारीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
या बैठकीमुळे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या समस्या थेट पोलीस प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार असून, तक्रारींच्या निवारणासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.