मानखुर्दमध्ये सहा एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

0
28
मानखुर्दमध्ये सहा एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मानखुर्दमध्ये सहा एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

मानखुर्दमध्ये सहा एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

सायन-पनवेल महामार्गालगत ५७ अनधिकृत वाणिज्य गाळ्यांवर कारवाई; विशेष मोहिमेत आतापर्यंत ५३ एकर जमीन शासनाच्या ताब्यात

मुंबई :
मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील वर्षानुवर्षे प्रलंबित अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली मानखुर्द येथील सायन-पनवेल महामार्गालगत चिल्ड्रेन्स एड सोसायटी परिसरातील शासकीय जमिनीवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेले ५७ अनधिकृत वाणिज्य गाळे निष्कासित करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणची सुमारे ६ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून शासनाच्या ताब्यात घेण्यात आली.
मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून शासकीय जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ५३ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून शासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे.
शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, मानखुर्द येथील कारवाईतून शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here