मुंबईत अखिल भारतीय कबड्डी पंच परीक्षा २२ मे ते २४ मे २०२६ रोजी आयोजित

0
29

महाराष्ट्रातील १५० पंचांचा सहभाग

मुंबई :
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आणि भारतीय हौषी कबड्डी महासंघ यांच्या मान्यतेने अखिल भारतीय पंच परीक्षा २२ मे ते २४ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.  भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई शहर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
ही परीक्षा भारतीय क्रीडा मंदिर येथे पार पडणार असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे १५० पंच सहभागी होणार आहेत.
सदर पंच परीक्षेचे उद्घाटन २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्र. अध्यक्ष / कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर तसेच उपाध्यक्ष अशोक जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
या परीक्षेसाठी भारतीय हौषी कबड्डी महासंघाच्या वतीने जगमोहन आणि विश्वास मोरे यांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील कबड्डी पंचांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार प्रशिक्षण आणि मूल्यमापनाची संधी या परीक्षेमुळे उपलब्ध होणार असून कबड्डी खेळाच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here