रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा; “कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची दक्षता घ्या” – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

0
35
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा; “कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची दक्षता घ्या” – पालकमंत्री डॉ. उदय सामंतरत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा; “कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची दक्षता घ्या” – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा; “कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची दक्षता घ्या” – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा; “कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची दक्षता घ्या” – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी :
उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या मान्सून पूर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सभापती महेश नाटेकर, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मान्सून पूर्वतयारीबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. घाट परिसरातील दरड कोसळण्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मंडणगड येथील राज्य महामार्गाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यास सांगण्यात आले. तसेच ग्रामीण भागात पावसाळ्यात एसटी बस सेवा सुरळीत राहावी यासाठी विशेष आराखडा तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आरोग्य विभागाने औषधसाठा, रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालयांची पूर्वतयारी पूर्ण ठेवून साथीच्या आजारांवर त्वरित प्रतिसाद देण्याची व्यवस्था सज्ज ठेवावी, असे निर्देश देण्यात आले. महावितरणने पावसाळी कामे वेळेत पूर्ण करावीत, तर रेल्वे आणि बंदर विभागांनी भूस्खलन व पाणी साचण्याच्या समस्यांवर विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात आले.
तहसीलदारांना दरड कोसळण्याची, भूस्खलनाची तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीदरम्यान महसूल, महावितरण, रेल्वे, बंदर, मेरीटाईम बोर्ड, पाटबंधारे आणि आरोग्य विभागांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here