मुंबईत ठाकरे बंधूंची कडवी लढत !
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पन्नाशीचा टप्पा गाठता येणार नाही, असे अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत ठाकरे गटाने तब्बल ६७ जागा जिंकत निवडणुकीत कडवी लढत दिली आहे. दुसरीकडे, ५३ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या मनसेला अपेक्षित यश मिळवता आले नाही, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला मर्यादा आल्याचे चित्र दिसून आले.
या निवडणुकीत मुख्य लढत महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यातच होईल, त्यामुळे काँग्रेस फारशी प्रभावी ठरणार नाही, असे दावे केले जात होते. मात्र काँग्रेसने २४ जागांवर आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर ९० जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ २८ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे महायुतीला बहुमताचा आकडा गाठताना मोठी कसरत करावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.


