मुंबईत तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचा शुभारंभ; ३० देशांतील २०० हून अधिक शहरांचे प्रतिनिधी सहभागी
मुंबई :
जागतिक नागरी नेतृत्व, शहरांचा विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचा (3rd World Mayors’ Forum) आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील विविध शहरांचे महापौर आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.



