मुंबईत २२ जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणार
मुंबईत २२ जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणार
मुंबई –
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे झालेल्या या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, कार्यक्रम तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील विविध प्रश्न, विकासकामे, शासकीय धोरणे आणि जनहिताच्या मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी अधिवेशनात महत्त्वाची विधेयके, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना आणि विविध विषयांवरील चर्चा होणार आहेत.
बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.