मुंबईत २८ व २९ नोव्हेंबरला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी शिबिरे
मुंबईत २८ व २९ नोव्हेंबरला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी शिबिरे
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित मतदान केंद्रांवर आयोजन; मतदारांना गणना प्रपत्र उपलब्ध करून देणार
मुंबई :
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित मतदान केंद्रांवर २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करून दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
मतदारांनी या शिबिरांचा लाभ घेऊन गणना प्रपत्रासंदर्भातील आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.