मुंबई बँकेत ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह’ाचे उद्घाटन; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती

0
9

मुंबई :
फोर्ट येथील ‘मुंबई बँक भवन’ येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह’ाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
मुंबई बँकेत ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह’ाचे उद्घाटन; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती
मुंबई बँकेत ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह’ाचे उद्घाटन; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा पाया भक्कम करण्यात महत्त्वाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण स्व. वसंतदादा पाटील यांच्या नावाने सभागृहाची निर्मिती करणे, ही त्यांच्या वैभवशाली विचारांना दिलेली मानवंदना असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हिरक महोत्सवी टप्पा पार केलेल्या मुंबई बँकेने सहकार क्षेत्रात यशाचे नवे टप्पे गाठले आहेत. स्वयंपुनर्विकास योजना, गिरणी कामगारांची घरे, नमो सहकार टॅक्सी, लाडकी बहीण योजनेतील बचत खाती, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक डिजिटल बँकिंग अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न बँकेने केला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक तथा प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, संचालक नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबळे, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे उपस्थित होते. तसेच शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, जयश्री पांचाळ यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईच्या विकासासाठी तसेच सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही महापौर रितू तावडे यांनी यावेळी दिली.
SEO Title: मुंबई बँकेत पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाचे उद्घाटन; महापौर रितू तावडे उपस्थित | Sindhudurg Samachar
SEO Tags: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबई बँक भवन, वसंतदादा पाटील सभागृह, रितू तावडे, राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर, मुंबई सहकार चळवळ, सहकारी बँक, मुंबई विकास, Sindhudurg Samachar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here