मुंबई-गोवा महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना महसूल प्रशासनाचा दिलासा; नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

0
14

अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत; प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

पनवेल, दि. ७ जुलै : अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने अडकलेल्या प्रवाशांसाठी महसूल प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. महामार्गावर अडकलेल्या नागरिकांसाठी नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक ती मदत पुरविण्यात येत आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महसूल प्रशासन, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे तसेच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीनुसार आवश्यक ते मदतकार्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here