रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

0
18
रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा
रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट; पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे, प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

मुंबई, दि. ७ जुलै : राज्यातील अतिवृष्टी आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड, रत्नागिरीसह विविध जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाला सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच, सुधागड आणि रोहा परिसरासाठी अतिरिक्त १४५ जवानांची मागणी करण्यात आली असून, गरज भासल्यास त्वरित बचाव व मदतकार्य सुरू करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय कर्जत आणि खोपोली येथील सेवाभावी संस्थांशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार त्यांच्या मदतीचा उपयोग जिल्ह्यातील इतर भागांमध्येही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून पूरस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क आणि सज्ज असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here