मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

0
64
अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका
अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका

मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील गारळ गावाच्या हद्दीत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, दोन कार आणि एका दुचाकीच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गारळ फाट्याजवळील नवीन हॉटेल आनंद भुवनसमोर सुझुकी बलेनो (MH 46 DA 1229) आणि व्हॅगनआर (MH 08 BE 7561) या दोन कारने होंडा शाईन दुचाकीला (MH 06 BR 6826) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अण्णा काळे (रा. खांदाड, ता. माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये अण्णा काळे महामार्ग ओलांडत असताना समोरून आणि बाजूने आलेल्या कारने त्यांना दोन वेळा धडक दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. धडकेनंतर ते काही अंतर फरफटत गेले असून अपघाताचे स्वरूप अत्यंत गंभीर होते.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here