मुंबई पोलिसांकडून १ कोटी ७३ लाखांची मालमत्ता मूळ मालकांच्या स्वाधीन
मुंबई पोलिसांकडून १ कोटी ७३ लाखांची मालमत्ता मूळ मालकांच्या स्वाधीन
मुंबई :
मुंबई पोलिसांच्या उत्तर परिमंडळ-२ अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच हरवलेली मालमत्ता शोधून ती संबंधित कायदेशीर मालकांच्या स्वाधीन करण्यात आली. पोलिसांनी एकूण १ कोटी ७३ लाख १ हजार ५५४ रुपये किमतीची मालमत्ता मूळ मालकांना परत केली.
यामध्ये ६८४ ग्रॅम वजनाचे सोने, २२ लाख ८७ हजार ५५४ रुपयांची रोख रक्कम, ३४८ मोबाईल फोन, ऑनलाइन फसवणूक प्रकरणांतून परत मिळवलेली रक्कम, १३ दुचाकी आणि एका ऑटो-रिक्षेचा समावेश आहे.
विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेली तसेच नागरिकांची हरवलेली मालमत्ता शोधून काढत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती संबंधित मालकांकडे सुपूर्द करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू व रक्कम परत मिळाली आहे.