मुंबई महापालिकेत महायुतीचा ऐतिहासिक विजय; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

0
113

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीने बहुमताचा आकडा गाठत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजपला ८८, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३७ जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.

या मोठ्या विजयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांचे आणि ठाणेकरांचे मनापासून आभार मानले. “मुंबई महानगरपालिकेत मॅजिक फिगर पार करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हा विजय विकासाच्या अजेंड्यावर मिळालेला कौल आहे,” असे शिंदे म्हणाले.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, एमएमआर परिसरात महायुतीला मोठे यश मिळाले असून, विकासकामांची गती आणखी वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेगवान कारभार देण्याचे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here