मुरबाडच्या आदिवासी वनधन उत्पादनांना प्रोत्साहन

0
50
मुरबाडच्या आदिवासी वनधन उत्पादनांना प्रोत्साहन
मुरबाडच्या आदिवासी वनधन उत्पादनांना प्रोत्साहन

मुरबाडच्या आदिवासी वनधन उत्पादनांना प्रोत्साहन

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची नाणेघाट वनधन विक्री केंद्रास भेट

ठाणे / मुरबाड l प्रतिनिधी

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्यातील स्थानिक आदिवासी बांधवांनी बांबू व इतर वनउपजापासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या नाणेघाट येथील वनधन विक्री केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी आदिवासी बांधवांच्या हस्तकलेचे कौतुक करत त्यांच्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, प्रांताधिकारी विश्वास गुजर, वन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते. वनधनविक्री केंद्रामार्फत आदिवासी बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी आदिवासी समुदायाच्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याची गरज अधोरेखित करत, गुणवत्तावाढ, पॅकेजिंग आणि विपणनावर भर देण्याच्या सूचना केल्या. या उपक्रमांमुळे आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक आदिवासी युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here