मुरूडमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
मुरूडमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
मुरूड :
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती, मुरूड यांच्यावतीने १० सप्टेंबर २०२६ रोजी श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय, यशवंतखार, मजगांव, ता. मुरूड येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात एडीआर (पर्यायी वाद निवारण) पद्धती व त्याचे फायदे, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, अंमली पदार्थांचा गैरवापर व व्यसन, पोस्को कायदा तसेच ‘जागृती योजना २०२५’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका विधी सेवा समिती, मुरूडचे अध्यक्ष तसेच पॅनल वकिलांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेशीर तरतुदी आणि त्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करून त्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची माहिती व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.