लोणावळ्यात ड्रोनसह रिमोट नियंत्रित उपकरणांच्या वापरावर बंदी

0
12
लोणावळ्यात ड्रोनसह रिमोट नियंत्रित उपकरणांच्या वापरावर बंदी
लोणावळ्यात ड्रोनसह रिमोट नियंत्रित उपकरणांच्या वापरावर बंदी

लोणावळ्यात ड्रोनसह रिमोट नियंत्रित उपकरणांच्या वापरावर बंदी

पुणे :
उपराष्ट्रपती यांच्या १८ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या लोणावळा, पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार १९ सप्टेंबर २०२६ रोजी उपराष्ट्रपतींचा दौरा संपेपर्यंत लोणावळा व परिसरात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून तसेच तत्सम हवेत उडणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here