सिंगापूरमध्ये महाराष्ट्र मंडळात उत्साहात गणेशोत्सव
महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि कलागुणांचा जागर
सिंगापूर :
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर येथे गणेशोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पारितोषिक विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.



