ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

0
10
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई :
ज्येष्ठ कन्नड अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२४ सालचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार या पुरस्काराची घोषणा केली आहे.
अनंत नाग यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास पाच दशकांहून अधिक काळाचा असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यांनी विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीसह विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथे होणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here