मुलुंडमध्ये ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन

0
25
मुलुंडमध्ये ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन
मुलुंडमध्ये ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन

मुलुंडमध्ये ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन

कोकणातील उद्योजकांना व्यासपीठ

मुंबई : कोकणातील उद्योजकांनी साकारलेली ‘कोकणी बाजारपेठ’ आता मुलुंडमध्ये भरत असून मुलुंड, भांडुप, ठाणे आणि मुंबई परिसरातील नागरिकांसाठी खरेदीची खास पर्वणी ठरणार आहे.
दि. 8 आणि 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या बाजारपेठेत कोकणातील उद्योजकांनी तयार केलेले घरगुती पदार्थ, आकर्षक दागिने, सुंदर साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने तसेच विविध उपयुक्त वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
हा उपक्रम स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासोबत या बाजारपेठेला भेट देऊन कोकणातील उत्पादनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : दत्तात्रेय एनेक्स हॉल, शिवसेना शाखेच्या वर, मुलुंड स्टेशन समोर, मुलुंड (पूर्व), मुंबई
तारीख : 8 व 9 ऑगस्ट 2026
वेळ : सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here