सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा 12 ऑगस्ट रोजी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा 12 ऑगस्ट रोजी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता परब यांनी दिली.
शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असून समिती सदस्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.