मुलुंडमध्ये पुन्हा रंगणार ‘कोकणी बाजार पेठ’; कोकणच्या उद्योजकांची उत्पादने एका छताखाली
मुलुंडमध्ये पुन्हा रंगणार ‘कोकणी बाजार पेठ’; कोकणच्या उद्योजकांची उत्पादने एका छताखाली
मुंबई –
कोकणातील उद्योजक, महिला व्यावसायिक आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणारी ‘कोकणी बाजार पेठ’ पुन्हा एकदा मुलुंडमध्ये भरत आहे. विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंची मेजवानी अनुभवण्याची संधी यानिमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.
ही प्रदर्शनी २७ आणि २८ जून २०२६ रोजी दत्तात्रेय अॅनेक्स हॉल, शिवसेना शाखेच्या वर, मुलुंड स्टेशनसमोर, मुलुंड (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते रात्री ९.०० अशी राहणार आहे.
या बाजारपेठेत साड्या, ज्वेलरी, कोकणी मेवा, घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, होम डेकोर, खेळणी तसेच विविध उद्योजकांची खास उत्पादने उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांना थेट उद्योजकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या उत्पादनांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
स्थानिक उद्योजकांच्या व्यवसायाला चालना देणे, महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ‘वोकल फॉर लोकल’ संकल्पनेला बळ देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करण्याचे, उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे आणि स्थानिक व्यवसायांना पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे.