ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी ‘परिवर्तन पॅनल’च्या विजयाचा निर्धार

0
29

ठाणे : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६–२०३१ च्या पार्श्वभूमीवर महायुती पुरस्कृत ‘ परिवर्तन पॅनल’’च्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी ठाणे जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत निवडणूक नियोजन, संघटनात्मक बांधणी तसेच मतदारांपर्यंत विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महायुतीच्या विकासाभिमुख विचारांवर विश्वास व्यक्त करत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार हेमंत सावरा, आमदार सुलभा गायकवाड, प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक, महापौर सुजाता पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी आणि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन पॅनल कटिबद्ध असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here