‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६’ प्रदान
नागपूर, प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून लोकसहभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विकासाची नवी क्रांती घडत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केले.

नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आले.रणजीतबाबू देशमुख (Ranjitbabu Deshmukh Foundation) यांच्या वतीने माजी ग्रामीण विकास मंत्री रणजीत देशमुख (Ranjit Deshmukh) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.



