रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला ‘विशेष लोकअदालत’

0
8
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'

रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला ‘विशेष लोकअदालत’

 धनादेश अनादर प्रकरणे तडजोडीने मिटवण्याची संधी

रत्नागिरी :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही विशेष लोकअदालत होणार आहे.
या विशेष लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने न्यायालयात प्रलंबित असलेली बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित धनादेश अनादर (Cheque Bounce) प्रकरणे तडजोडीने आणि परस्पर संमतीने निकाली काढण्यात येणार आहेत.
पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत आणि मोठ्या संख्येने लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद यशवंतराव जाधव यांनी केले आहे.
आपली प्रकरणे विशेष लोकअदालतीसमोर ठेवू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी आपल्या वकिलांशी, संबंधित न्यायालयाशी अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रामचंद्र पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here