रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल शेतकऱ्यांच्या बांधावर

0
17
रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल शेतकऱ्यांच्या बांधावर
रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल शेतकऱ्यांच्या बांधावर

रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी :
पावसाने दिलेली ओढ आणि ऐन खरीप हंगामात वाढलेले कडक ऊन यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे येथील कातळवाडी आणि डुगवे परिसराला त्यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या परिसरातील भातशेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक ठिकाणी भाताची शेते करपलेली असून दाणे पोकळ राहिल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी शेतकऱ्यांकडून थेट जाणून घेतली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि शेतीच्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here