८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात मेगा मेडिरत्नागिरी जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपर्यंत दिव्यांग तपासणी शिबिरेकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर
रत्नागिरी जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपर्यंत दिव्यांग तपासणी शिबिरे; सात ठिकाणी आयोजन
रत्नागिरी :
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठी विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देवरुख, दापोली, मंडणगड, कामथे, राजापूर, गुहागर आणि कळंबणी येथे ही शिबिरे होणार आहेत. संबंधित परिसरातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
शिबिरांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून
६ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, देवरुख, १५ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, दापोली, २२ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड आणि २७ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे तपासणी शिबिर होणार आहे.
त्यानंतर
२ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, राजापूर, ९ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, गुहागर आणि १६ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दिव्यांगांनी आपल्या परिसरासाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेनुसार जवळच्या शासकीय रुग्णालयात उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.