८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात मेगा मेडिरत्नागिरी जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपर्यंत दिव्यांग तपासणी शिबिरेकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि वालावलकर हॉस्पिटलतर्फे ‘सॅम-मॅम’ बालकांसाठी विशेष आरोग्य शिबीर
७६ बालकांची तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय पाली येथे ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) आणि ‘मॅम’ (मध्यम तीव्र कुपोषित) बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे २ जुलै रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय आणि वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरबीएसके विभाग ग्रामीण रुग्णालय पाली यांच्या समन्वयाने हे शिबीर पार पडले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान ज्या बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळली होती, त्यांच्यावर विशेष उपचार करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष आरोग्य शिबीराचा ७६ बालकांनी लाभ घेतला.
तपासणीअंती बालकांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे: ७ बालके: तीव्र कुपोषित (सॅम), ६७ बालके: मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) २ बालके: इतर किरकोळ आजारांनी ग्रस्त
शिबीरामध्ये वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. प्रतिक गोडसे यांनी उपस्थित सर्व बालकांची सखोल वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषध वाटप केले.
याशिवाय, कुपोषण मुक्तीसाठी वालावलकर हॉस्पिटलतर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘लड्डू गोपाल’ योजनेअंतर्गत शिबिरातील ५० बालकांना पौष्टीक लाडूंचे वाटप करण्यात आले.
केवळ उपचारच नव्हे, तर बालकांमधील कुपोषण पूर्णपणे दूर करण्यासाठी पालकांचे विशेष समुपदेशनही करण्यात आले. यामध्ये बालकांचा आहार कसा असावा, पालकांनी घरी कोणती काळजी घ्यावी आणि स्वच्छतेचे काय महत्त्व आहे, याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर शिबीर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामीण रुग्णालय पालीच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या उत्तम समन्वयाने संपन्न झाले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय पथक आरबीएसके, ग्रामीण रुग्णालय पाली तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.