रत्नागिरी : संजय बबन दळवी, वय ४१ वर्ष, ग्रामसेवक ग्रामपंचायत, परुळे, ता. राजापूर जि. रत्नागिरी(वर्ग-३)यांनी तक्रारदार यांचे राहते घराचा असेसमेंट उतारा तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावावरून त्यांचे वडिलांच्या नावावर करून देण्यासाठी यातील लोकसेवक आरोपीने तक्रारदार यांच्याकडे 3000/— रुपये लाचेची मागणी केली होती.
त्याबाबत तकारदार यांनी दि.14/07/2022 रोजी एसीबी कार्यालयात तक्रार दिली. सदर तक्रारीची दि.14/07/2022 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता नमूद लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम 3000/- रुपये आज दिनांक 27/07/2022 रोजी तक्रारदार यांचे पाचल बाजारपेठ येथील कार्यालयात पंचानसमक्ष स्वीकारल्यानंतर आलोसे यांना नारकर चाळ, पाचल येथील आलोसे यांच्या राहते घराच्या बाहेर पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले असून, पुढील कारवाई चालू आहे.या सापळा पथकामध्ये श्री. प्रवीण ताटे,पोलीस निरीक्षक,लाप्रवि रत्नागिरी पोहवा/संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोशि/ हेमंत पवार, राजेश गावकर, समाविष्ट होते.
➡️ पर्यवेक्षक अधिकारी :-
श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक, ACB रत्नागिरी
▶️ मार्गदर्शन अधिकारी-
- मा.श्री.पंजाबराव उगले सो, अपर पोलिस आयुक्त, ठाणे पोलिस आयुक्तालय, (पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र ,अतिरिक्त कार्यभार)
२.श्री अनिल घेरडीकर सो, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी.
रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.नं.9823233044
३) श्री प्रविण ताटे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो. नं. 8055034343
4) श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.न. 7507417072
३) टोल फ्री:- १०६४V


