सिंधुदुर्ग: ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा इशारा

0
27

मुंबई- मुंबईसह उपनगरात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी म्हणजे आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, ,सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here