रथसप्तमी–संक्रांतीनिमित्त रत्नदीप सोसायटीत हळदीकुंकू समारंभ उत्साहात

0
143

पुणे :
रथसप्तमी व संक्रांती या सणांचे महिलांसाठी असलेले विशेष महत्त्व लक्षात घेऊन पुणे येथील रत्नदीप सोसायटीतील रॉकिंग वुमन्स महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात सुगड पूजन, हळदीकुंकू आणि तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

परंपरा, संस्कृती आणि महिलांचे आपुलकीचे नाते जपणारा हा कार्यक्रम सोसायटीतील महिलांसाठी विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमामुळे सामाजिक सलोखा वाढीस लागला असून सणांचा आनंद सामूहिकरित्या साजरा करण्याची भावना अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here