रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी चंद्रकांत दळवी यांची फेरनिवड

0
32
रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी चंद्रकांत दळवी यांची फेरनिवड
रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी चंद्रकांत दळवी यांची फेरनिवड

रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी चंद्रकांत दळवी यांची फेरनिवड

पुणे : आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पुणे येथे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मॅनेजिंग कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.

बैठकीत चंद्रकांत दळवी यांची चेअरमनपदी, तर ॲड. भगीरथ शिंदे यांची व्हाइस चेअरमनपदी निवड करण्यात आली. विभागीय चेअरमनपदी संजीव पाटील (मध्य विभाग), संगीता प्रकाश पाटील (दक्षिण विभाग), आमदार चेतन तुपे (पश्चिम विभाग), आमदार रोहित पवार (उत्तर विभाग) आणि माजी आमदार बाळाराम पाटील (रायगड विभाग) यांची निवड करण्यात आली.

तसेच, सहसचिव (उच्च शिक्षण) पदावर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (माध्यमिक विभाग) पदावर प्राचार्य बी. एन. पवार यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य डॉ. राजेंद्र यांची ऑडिटरपदी फेरनिवड करण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here