राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १८ जून रोजी मतदान

0
21
राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १८ जून रोजी मतदान
राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १८ जून रोजी मतदान

राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १८ जून रोजी मतदान

मुंबई : राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या जागेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, १ जून २०२६ पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून १८ जून २०२६ रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ८ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. ९ जून रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल, तर ११ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.
१८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २० जून २०२६ पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • निवडणूक अधिसूचना : १ जून २०२६
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ८ जून २०२६
  • अर्ज छाननी : ९ जून २०२६
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ११ जून २०२६
  • मतदान : १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४)
  • मतमोजणी : १८ जून २०२६ (सायंकाळी ५ वाजता)
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण : २० जून २०२६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here